बिघडलेल्या मुलाला सुधरवण्याचे चालू आहे, विजय शिवतारे यांची पार्थ पवारांवर जोरदार टीका

मावळ – पबमधे नाचणारा अचानक रथयात्रेत नाचू लागतो, बघा काय जादू आहे या पक्षाची, अशा शब्दात विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मधील लोकसभा उमेदवार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर टीका केली आहे. युतीचे मावळ मधील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना शिवतारे यांनी पार्थ पवार यांच्यावर जोरदार टीका करत विदेशी गाड्यांमध्ये बसणारा रेल्वेत बसू लागतो, ज्याने कधीच शेत पाहिलं नाही तो शेतात फिरू लागतो. त्यामुळे बिघडलेल्या मुलाला सुधरवण्याचे चालू आहे, असे ते ,म्हणाले.

पुढे बोलताना आजोबा म्हणाले नातवाला निवडून द्या, तर नात म्हणतो आजोबांना पंतप्रधान करायचं आहे. अशा फक्त स्वार्थ पाहणाऱ्या लोकांना लोकशाहीतून हद्दपार करायला पाहिजे. असे शिवतारे म्हणाले. तर पार्थ पवारांना निवडणुकीत उतरवलं आहे म्हणजे यावेळी भरपूर लक्ष्मी पाहायला मिळणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)