विश्‍वचषक स्पर्धेत विजय शंकर चौथ्या क्रमांकावर खेळणार

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर प्रकर्षाने जाणवनाऱ्या मधल्या फळीचा प्रश्‍न आणखीनच गंभीर बनला असून विश्‍वचषकात भारतीय संघात या क्रमांकावर विजय शंकर फलंदाजी करताना दिसण्याची शक्‍यता सध्या वर्तविण्यात येते आहे.

भारतीय संघातील सलामीवीर आणि तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज असलेला कर्णधार विराट कोहली आपल्या कामगिरीतून सर्वांनाच प्रभावीत करताना दिसून आले आहेत. मात्र, यावेळी चौथ्या क्रमांकावरील फलंदाज गेल्या दोन वर्षांपासून अपयशी ठरत असल्याने अनेक वेळा चांगल्या सुरूवातीनंतर भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यातल्या त्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर असताना भारतीय संघाला पहिल्या दोन सामन्यांमधे विजय मिळाल्यानंतर पुढील तिन्ही सामन्यात पराभुत व्हावे लागल्याने मालिका गमवावी लागली होती. त्यावेळी विश्‍वचषकात मधली फळी किती महत्वपूर्ण कामगिरी बजावनार असल्याचे समजून आले. त्यामुळे यावेळी विश्‍वचषक स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर कोणता खेळाडू खेळनार हे भारतीय संघासमोरील सर्वात मोठे आव्हान होते.

त्यानुसार गेल्या दोन वर्षात भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी अनेक प्रयोग देखील झाले होते. ज्यात अंबाती रायडू, विजय शंकर, महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत आदी खेळाडूंना तपासून पाहिले होते. ज्यात, धोनी आणि रायडू वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना संघासाठी सामने जिंकून देण्याची क्षमता ठेवणारा फलंदाजा ठरत असल्याने त्याचा विचार या क्रमांकासाठी केला जाऊ लागला असला तरी चौथ्या क्रमांकावरील फलंदाज अंबाती रायडूहा मोठ्या खेळी करण्यात अपयशी ठरल्याने भारतीय संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडला असून या क्रमांकावर आता विजय शंकरचा विचार केला जात असल्याचे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

त्यापुर्वी, चौथ्या स्थानासाठी अंबाती रायुडू दावेदार मानला जात होता. परंतु 47 धावांची सरासरी असूनही, मागील सामन्यांमध्ये त्याला सातत्यपूर्ण कामगिरी दाखवण्यात अपयश आले आहे. त्याने वेलिंग्टन येथे साकारलेली 90 धावांची खेळी वगळल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्ये रायडूला प्रभावी कामगिरी दाखवता आलेली नाही. आयपीएलमध्ये त्याने उत्तम कामगिरी दाखवल्यास त्याला आपले स्थान टिकवता येऊ शकेल. परंतु मध्यमगती गोलंदाजी खेळणे त्याला कठीण जात असल्याने त्याला भारतीय संघातील स्थान टिकवणे कठीण जाण्याची शक्‍यता असून या क्रमांकावर शंकरला प्रमुख दावेदार मानले जात आहे.

शंकर या क्रमांकावर खेळण्याची शक्‍यता ही मागिल काही विश्‍वचषकातील संघ निवडीचा इतिहास बघता योग्य वाटते. ज्यात 2003च्या विश्‍वचषक स्पर्धेत व्हीव्हीएस लक्ष्मणला वगळून दिनेश मोंगियाला ऐनवेळी संघात स्थान देण्यात आले. कारण तो फिरकी गोलंदाजी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू होता. त्याच प्रमाणे 2011च्या विश्‍वचषकात भारताने पाचवा गोलंदाज वापर केलेल्या युवराज सिंगच्या खात्यावर 15 बळी जमा होते.

त्याच प्रमाणे 2019च्या विश्‍वचषकाला सामोरे जाताना भारताला अद्यापही चौथ्या स्थानासाठीची उणीव तीव्रतेने भासते आहे. 15 ते 20 एप्रिल या कालावधीत संघ जाहीर केला जाणार असल्यामुळे “आयपीएल’ ट्‌वेन्टी-20 क्रिकेटच्या पहिल्या तीन आठवडयांमध्ये चौथ्या स्थानासाठीचे पर्याय स्पष्ट होऊ शकतील, अशी आशा आहे. शंकरचे तंत्र आणि कठीण परिस्थिती हाताळण्याच्या वृत्तीबाबत भारतीय संघव्यवस्थापन समाधानी असल्याचे म्हटले जात आहे.


चौथ्या क्रमांकासाठी पंतच योग्य -पॉंटिग
आयपीएल मधील दिल्ली कॅपिटल संघाचा प्रशिक्षक रिकी पॉंटिंगने विश्‍वचषकासाठीच्या भारतीय संघरचनेत ऋषभ पंतला चौथ्या क्रमांकावर पसंती दिली आहे. याचप्रमाणे पंतमध्ये सामना जिंकून देण्याची क्षमता असल्याचे पॉंटिंगने नमूद केले आहे. विश्‍वचषकाच्या भारतीय संघात पंतला चौथ्या क्रमांकावर स्थान देऊन मी तुम्हाला विश्‍वचषक जिंकवून दाखवू शकतो, असा विश्वास पॉंटिंगने व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)