#ICCWorldCup2019 : हार्दिक सोबत स्पर्धा नाही – विजय शंकर

-दोघांनाही संघासाठी विजय मिळवायचा असतो

– चौथ्या क्रमाकांवर फलंदाजी करायला तयार

नवी दिल्ली – विश्‍वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर असताना चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजीला येइल या बाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी संघाच्या गरजेनुसार मी चौथ्या क्रमांकावर खेळण्यास तयार असल्याचे विधान नवोदित अष्टपैलू खेळाडू विजय शंकरने केला असुन त्याने त्याच्यात आणि हार्दिक पांड्या यांच्यात कोणतीही स्पर्धा नसल्याचे त्याने नमूद केले.

विश्‍वचषकासाठीच्या संघात अनपेक्षितपणे विजय शंकरला स्थान मिळाल्यानंतर सर्वांच्याच भुवया उचांवल्या होत्या. ज्यात अनेक आजी माजी खेळाडुंनी शंकरच्या सहभागा बद्दल निवड स्मितीवर ताशेरे ओडले होते. यावेळी निवदसमितीने शंकरच्या न्युझीलंड मधिल अष्टपैलू खेळाचा दाखला देत त्याची निवड योग्य असल्याचे सांगताना तो संघासाठी चौथ्या क्रमांकवरील योग्य फलंदाज असुन अर्धवेळ गोलंदाज म्हणुन देखील उपयुक्त असल्याचे सांगितले होते. त्यामुळे यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेत विजय शंकर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसण्याची शक्‍यता अशीक आहे.

यावेळी विश्‍वचषक स्पर्धे विषयी शंकरचे मत विचारले असता विजय म्हणाला की, संघ ज्या क्रमांकावर मला खेळ मणेल त्य क्रमांकावर फलंदाजी करणे हे माझे कर्तव्य आहे, त्याच बरोबर माझी आणि हार्दिकची तुलना कोणत्याच प्रकारे होऊ शकत नही. कारण आमच्या दोघांचीही खेळण्याची पद्धत संपुर्ण वेगळी असुन आम्ही दोघेही संघाच्या विजयासाठीच खेळत असतो त्यामुळे आमची तुलना करु नका.

मी आणि हार्दिक संपुर्ण वेगळ्या शैलीचे खेळाडू आहेत. तो उत्कृष्ठ खेळाडू आहे. आम्ही दोघेही जरी अष्टपैलू खेळाडू असलो तरी आम्ही वेगळ्या प्रकारचे खेळाडू आहोत. आम्ही दोघेही सर्व वेळ संघच्या विजयासाठी प्रयत्नशील असतो त्यामुळे तुलना करणे अयोग्य ठरेल असेही त्याने यावेळी नमूद केले.

हार्दिक पांड्या आणि विजय शंकर हे दोन्ही खेळाडू त्यांच्या फटकेबाजी आणि जोरदार षटकारांसाठी ओळखले जातात. त्यात हार्दिककडे टायमींग आणि शक्तीचे मिश्रण आहे तर शंकरकडे टायमींग आणि चेंडूच्या वेगाचा वापर करण्याची कला आहे. त्यामुळे दोघेही खेळाडू संघाला खराब स्थितीतून चांगल्या स्थितीत आणन्याची ताकत ठेवतात.

यावेषयी बोलताना शंकर म्हणाला की, मला षटकार मारायला खुप आवडतात, षटकार मारण्यासाठी मी टायमींगवर जास्त अवलंबुन असतो. मी अनेक वेळा केवळ शक्तीच्या जोरावर षटकार मारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मला त्यात यश आले नव्हते. त्यामुळे मी आता केवळ टायमींगवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातच न्युझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेने माझा स्वताःवरील विश्‍वास वाढवला. यावेळी माझ्या संघाला मझी गरज असताना मी फलंदाजी आणि गोलंदाजीच्या माध्यमातुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला यचा मला आनंद आहे. अशा आहे की मी विश्‍वचषक स्पर्धेतही संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलेल.

विश्‍वचषकाला रवाना होण्यापुर्वी भारतीय संघातील प्रमुख खेळाडू आराम करत असताना विजय शंकर हा चेन्नई येथे त्याच्या बालपणीच्या प्रशिक्षकांच्या हाताखाली सराव करत होता, यावेळी त्याला त्याच्या फलंदाजीत सुधारणा होण्यासाठी व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांनी काही टिप्स दिल्या होत्या, त्यांचा देखील त्याने आपल्या सरावात सहभाग केला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)