#CWC19 : विजय शंकर विश्‍वचषकातून बाहेर; मयंक अग्रवालला मिळणार संधी

लंडन – भारतीय क्रिकेट संघाला विश्‍वचषकात आणखी एक झटका बसला आहे. शिखर धवन नंतर आता विजय शंकर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला असून त्याच्या जागी मयंक अग्रवालची निवड केली गेली आहे. विजय शंकरला सरावसत्रा दरम्यान टाचेला झालेल्या जखमेनंतर तो या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

ऑलराऊंडर विजय शंकरला सराव करताना टाचेला जखम झाली होती. त्यामुळे तो इंग्लंड विरूद्धचा सामना खेळला नाही. त्यामुळे इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात त्याच्या ऐवजी ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती. विजय शंकर याला अंबाती रायडूच्या ऐवजी विश्‍वचषकासाठीच्या 15 सदस्यांमध्ये संधी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजयला पायाला दुखापत झाल्यामुळे इंग्लंड विरूद्धच्या सामन्यातून वगळ्यात आले होते. आता त्याच्या ऐवजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मयंक अग्रवाल याचे नाव संघात सामील करण्यात आले. यापूर्वी भारताचा सलामीवीर शिखर धवन भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात नाथन कुल्टन नाइलचा उसळता चेंडू हाताच्या डाव्या अंगठ्याला लागल्यामुळे संघातून बाहेर पडला होता.

विजयला सराव करताना जसप्रित बुमराहचा चेंडू पायाला लागला होता. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो या स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे तो मायदेशी परतणार आहे, असे बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन मयंक अग्रवालला त्याच्या जागी संघात स्थान देण्याची शक्‍यता आहे. मयांक अग्रवाल हा सलामीवीर असून पुढील दोन सामन्यात रिषभ पंत चालला नाही तर के एल राहुल पुन्हा आपल्या 4 क्रमांकावर खेळू शकेल, असेही सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)