विजय गोयल यांचे ‘दिल्ली सरकार’च्या विरोधात बैलगाडी चालवून आंदोलन

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी रविवारी दिल्लीच्या चांदणी चौकात बैलगाडीतून दिल्ली सरकार विरोधात आंदोलन केले. विजय गोयल यांनी केजरीवाल सरकारला पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली.

गोयल यांनी म्हटलं आहे की, इतर राज्याप्रमाणे केजरीवाल सरकारने सुध्दा वॅट कमी करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले पाहिजेत. यासाठी विजय गोयल यांनी लाल किल्ल्यापासून बैलगाडीतून रॅली काढली. त्यांच्या या रॅलीत मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते होते.

विजय गोयल यांनी म्हटलं की, दिल्ली सरकार बैलगाडी सारखी एक चाल चालत आहे. सरकारला सामान्य लोकांची काळजी नाही. त्यांनी म्हटले की जर दिल्ली सरकारने व्हॅट कमी केला तर पेट्रोल आणि डिझेलचे दर पाच रूपयांनी कमी होतील.

दरम्यान केंद्र सरकारने गुरूवारी पेट्रोल-डिझेलच्या दरावर 2.50 (अडीच) रूपयांची कपातीची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपाशासित राज्यात पेट्रोलियम उत्पादनावर लावण्यात आलेले कर कमी करण्यात आल्याने पेट्रोल-डिझेलचे दर पाच रूपयांनी कमी झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)