मतदार राजाची मतदानकेंद्रावर गर्दी
पश्चिम बंगाल – लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला पश्चिम बंगालमध्ये देखील जोरदार सुरवात झाली आहे. सर्व नागरिक आपला मतदानाचा हक्क बजवण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रावर गर्दी करू लागले आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल मधील मतदान केंद्रावर उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात एकूण 59 जागांसाठी हे मतदान होत असून एकूण 918 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. पश्चिम बंगालमधील डमडम, बारासात, बासिरहात, जयनगर, मथुरापूर, जदवपूर, डायमंड हार्बर या भागांमध्ये आज मतदान पार पडणार आहे.
West Bengal: Preparations are underway at polling booth no.162 at Calcutta Boys School in North Kolkata parliamentary constituency. Voting for the 7th and last phase of #LokSabhaElections2019 will begin at 7 AM today. pic.twitter.com/0VkE7bumZB
— ANI (@ANI) May 19, 2019