भ्रष्टाचार विरुध्द दक्षता जनजागृती रॅलीने शहर दुमदुमले 

कोल्हापूर – दक्षता जनजागृती सप्ताह 29 ऑक्‍टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला असून या सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने आज काढण्यात आलेल्या भ्रष्टाचार विरुध्द दक्षता जनजागृती रॅलीचा प्रारंभ अतिरिक्त्‌ पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

भवानी मंडपापासून सुरू झालेल्या या रॅर्लीच्या शुभारंभ कार्यक्रमास न्टी करप्शन ब्युरोचे प्रमुख पोलीस उपअधीक्षक गिरीष गोडे, पोलीस निरीक्षक मारूती पाटील यांच्यासह न्टी करप्शन ब्युरोमधील कर्मचारी तसेच अनेक मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. या रॅलीत एनसीसी,आरएसपी,आयटीआय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. महापालिकेच्या अग्निशामन दलाच्या दोन फायर बुलेट या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरल्या.

रॅलीतील विद्यार्थ्यांनी लाच देणे व लाच घेणे हा गुन्हा आहे, भ्रष्टाचार टाळा देश मजबुत करा, भ्रष्टाचार निर्मुलनाचा विचार करे लोकशाही साकार व लाचेची माया टाकते कुटुंबावर दुर्दशेची छाया इत्यादी घोषणा देवून भ्रष्टाचार विरुध्द जनजागृती करण्यात आली. न्टी करप्शन ब्युरीकडे कार्यान्वित असलेला टोल फ्री क्रमांक 1064 चा उल्लेख असलेले भ्रष्टाचारा विरुध्दचे पोस्टर्स प्रदर्शित करुन भ्रष्टाचार विरुध्दच्या तक्रारी देण्याबाबत आवाहन करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)