विधानसभा निवडणूक 2018 : ‘योगी’ आता भाजपाचे तारणहार?

मध्यप्रदेश – निवडणूक आयोगाने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पाच राज्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून पाचही राज्यांची मतमोजणी एकाच दिवशी 11 डिसेंबरला होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज पत्रकार परिषदेत हा कार्यक्रम जाहीर केला.या पाचपैकी दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका भाजपा योगी आदित्यनाथ यांच्या भरवसे लढवणार आहे.

दरम्यान, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील भाजपाचे प्रदेश युनिट यांचे याबाबतीत एकमत असून, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करावा अशी मागणी जोर धरत आहे. भाजप पक्षाच्या मते योगी आदित्यनाथ यांच्या सहाय्याने हिंदू मत मिळविणे सोपे पडेल . 2017 च्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश तसेच चालू वर्षी पार पडलेल्या कर्नाटक निवनिकांमध्ये आदित्यनाथानीच प्रचार केला होता . यामुळे मध्यप्रदेश भाजपाचे नेता राजेश अग्रवाल यांनी सांगितले, “आमची इच्छा आहे कि योगींनी मध्यप्रदेश निवणुकीच्या प्रचार करावा कारण ते या राज्यात लोकप्रिय आहेत त्यामुळे त्यांच्या प्रभाव मोठ्या प्रमाणात मत मिळविण्यासाठी होणार आहे.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)