#व्हिडीओ: …जेव्हा पाकिस्तानी बॉलरचा चेंडू अंतरिक्षात पोहचला 

नवी दिल्ली – पाकिस्तानी संघ विश्‍वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यामुळे पाक संघाला क्रिकेटप्रेमींच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशातच आयसीसीने एक व्हिडीओ अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानी संघाचा खेळाडू मोहम्मद हाफिजचा आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये हाफिज मोहम्मद चेंडू टाकत असून तो चेंडू पूर्ण ब्रह्मांडाची सफर करून येतो. या व्हिडीओसबत आयसीसीने ट्विटमध्ये लिहले कि, जेव्हा तुमचे गोलंदाजीची प्रशिक्षक तुम्हाला म्हणतात, थोडा फ्लाईट टाक. आयसीसीच्या या ट्विटवर मोहम्मद हाफिजनेही उत्तर दिले आहे.

दरम्यान, मोहम्मद हाफिजने २०१९ च्या विश्वचषकात ८ सामन्यांमध्ये २५३ धावा केल्या आहेत. संपूर्ण विश्वचषकात त्याने केवळ एकच अर्धशतक पूर्ण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)