#व्हिडीओ : हेमंत करकरेंबद्दल साध्वींचे धक्कादायक वक्तव्य

भोपाळ – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह म्हंटले कि, त्यांनी (हेमंत करकरे) मला चुकीच्या पद्धतीने फसवले होते. मी त्यांना सांगितले होते कि, तुमच्या पूर्ण वंशाचा सर्वनाश होईल. बरोबर सव्वा महिन्याने सुतक लागते. ज्या दिवशी जेलमध्ये गेले होते त्याच दिवशी सुतक सुरु झाले. आणि बरोबर सव्वा महिन्यांनी दहशतवाद्यांनी त्यांना मारले. त्याच दिवशी त्यांचा अंत झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, हेमंत करकरे यांचा मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. याशिवाय साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आरोपी असलेली मालेगाव बाँबस्फोटच्या प्रकरणाचा तपासही त्यांच्या अखत्यारीत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)