#video पाकच्या परराष्ट्रमंत्र्याची पत्रकारांच्या प्रश्‍नांनी उडाली भंबेरी : व्हिडीओ व्हायरल

लंडन : पाकिस्तानात माध्यमांची गळचेपी होत असताना तुम्ही कुठल्या तोंडाने माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत बोलत आहात असा थेट सवाल पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांना पत्रकारांनी विचारला. कुरेशी हे शुक्रवारी लंडनमध्ये एका कार्यक्रमात सहभागी व्हायला गेले, मात्र तिथे त्यांना आणि त्यांच्या देशाच्या माध्यमांविषयीचा भूमिकेवरून पत्रकारांनी धारेवर धरले. पाकिस्तानी लष्कर माध्यमांवर बंधन आणतं, विरोधी पक्षाच्या नेत्यांना वाईट वागणूक दिली जाते असं असताना तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का?असा थेट प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला, त्यावेळी त्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

‘माध्यमांचं स्वातंत्र’या विषयावरच्या एका परिसंवादात सहभागी व्हायला कुरेशी हे लंडनमध्ये आले होते. ते कार्यक्रमस्थळी आल्यावर सर्व खुर्च्या रिकाम्याच होत्या. फक्त काही मोजके पत्रकार उपस्थित होते. त्यांनीच कुरेशी यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला. कॅनडाचे पत्रकार लेवेंट यांनी तर त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली. ईशनिंदेच्या आरोपांवरून लेवेंट यांचं एक ट्‌विट ट्‌विटरने तक्रारीवरून डिलीट केलं होतं. त्यानंतर पाकिस्तानी सरकारनं त्यांचं अकाऊंट ब्लॉक केलं होतं. त्यावर लेवेंट चांगलेच भडकले. तुम्हाला विचार स्वातंत्र मान्य नाही. माझ्या विचार स्वातंत्र्यावर बंधनं आणणारे तुम्ही कोण आहात असा सवाल त्यांनी केला. यानंतर कुरेशी यांनी वरवरची उत्तरे देत कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)