Video: ‘राष्ट्रीय कृषि परिषद की डान्सबार ? भाजपा आमदार अनिल बोंडे यांचा प्रताप’

अमरावती: महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी मदतीसाठी अपेक्षेने बघतो ते सरकारकडे, राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने मात्र शेतकऱ्याला मदतीच्या नावाखाली भरवलेल्या कृषि विकास परिषदेत चक्क नाच-गाण्यांचा कार्यक्रम घेतला. त्यामुळे विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे हा प्रकार घडला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या अधिकृत फेसबूकज पेजवर सरकारवर टीका केली आहे. पाटील म्हणाले, कृषी विकास परिषदेच्या नावाखाली भाजपाने जणू अश्लील नाचांचाच कार्यक्रम केला. भाजपाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी ही परिषद आयोजित केली होती. या परिषदेतील मंचावर अर्धे-मुर्धेच कपडे परिधान करून आलेली एक तरुणी आणि तिच्यासोबत नाचणारा एक माणूस असा व्हीडियो व्हायरल झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच नाचणारा हा माणूस म्हणजे चक्क वरुडचे माजी नायब तहसीलदार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना दुष्काळासबंधी मार्गदर्शन राहिलं बाजूला, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढण्याचं मार्गदर्शनही राहिलं बाजूला, शेरो-शायरी आणि अश्लील नाचामुळेच ही परिषद गाजली असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

एकीकडे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत असतानाच भाजपाचे नेते मात्र असे नाच-गाण्याचे कार्यक्रम भरवून शेतकऱ्यांना कशी मदत करतायत, हे कोडंच असल्याचेही पाटील म्हणाले.

https://www.facebook.com/NCPSpeaks/videos/568531650330197/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)