#व्हिडीओ : भारतीय वायूसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये जल्लोष

पुणे/ सातारा – भारताच्या वायूसेनेने आज पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला. यामध्ये २००-३०० दहशतवादी ठार झाले आहेत. हे वृत्त समजताच भारतात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. पुणे आणि सातारामध्येही लोकांनी ‘भारत माता की जय’चा जयघोष करत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी रस्त्यावरील वाहनधारकांना साखर पेढे वाटून नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

पुण्यात भारतीय ध्वजसहित शिवसेनेने ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला. तर साताऱ्यात नागरिकांनी फटाके वाजवून तसेच पेढे, साखर वाटप करून जल्लोष साजरा केला. भारतीय हवाई दलाचे सर्वांनी अभिनंदन करत ‘जला दो, जला दो, पाकिस्तान जला दो’च्या घोषणा दिल्या.

दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली असताना पाकवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत होती. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकल्याच्या वृत्ताने सर्वत्र जल्लोष साजरा होत आहे. भारतीय वायुसेनेच्या आजच्या हवाई हल्ल्याने प्रत्येक भारतीयाच्या मनात जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)