#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार

पुणे – पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयात मनाचे श्लोक सामुहिक पठणाचा जागतिक विक्रम करण्यात आला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात येणार आहे. यावेळी ११ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी श्री रामदास स्वामी यांचे मनाच्या श्लोकांचे सामुदायिक पठण केले.

निनाद पुणे, ओरायन स्टुडियोज, समर्थ व्यासपीठ आणि द्वारिका साऊंड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंगल स्वर आणि स्पष्ट शब्दोच्चारासह पुण्यातील स .प. महाविद्यालयाच्या मैदानावर ११ हजारांहून अधिकांच्या उपस्थितीत सामूहिक मनाच्या श्लोकाच्या पठणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये पुण्यातील शहर आणि उपनगरांतील ६४ शाळांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)