#व्हिडीओ : कोल्हापूरच्या राधानगरीत गवारेड्यांचा कळप कॅमेऱ्यात कैद

कोल्हापूर – जिल्ह्यातलं राधानगरी अभयारण्य हे गवारेड्यांसाठी प्रसिद्ध आहे. राधानगरीच्या अभयारण्यातील जंगलातील आणि घाटमाथा परिसरही पान तळ्यातील पाणी पातळी सध्या खालावत चालली आहे. यामुळे या गवा रेड्यांना पाणी मिळत नसल्यामुळे हे प्राणी अभयारण्यातून थेट नागरी वस्तीकडे येत आहेत. असाच 10 ते 12 गवारेड्यांचा एक कळप राधानगरीच्या मुख्य रस्ता पार करताना कॅमेऱ्यात कैद झाला.

हा कळप अभयारण्यातील घाटमाथ्यावरून पाण्यासाठी शहराकडे जवळील असणाऱ्या पानतळ्याकडे जाताना दिसत आहे. राधानगरीतील निसर्गप्रेमी आणि बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर आणि उद्धव मोरे यांनी हा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये शूट केलेला आहे. या व्हिडिओमध्ये ते दहा ते बारा गवारेड्यांचा कळप मुख्य रस्ता ओलांडून पान तळ्याकडे जाताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)