Video: पुण्याच्या इतिहासातील काळरात्र ! ‘पानशेत महापूर’

‘पानशेत धरण’ फुटल्यामुळे अंगावरील वस्त्रानिशी आणि मेहनतीने केलेली सगळी कमाई महापुराच्या स्वाधीन करून उघड्यावर पडलेल्या दुर्दैवी कुटुंबांच्या मदतीला तेव्हा देशभरातून प्रयत्न झाले. त्या पूरग्रस्तांच्या करून कहाण्या एकूण आजही डोळ्यातून अश्रुधारा मोकळ्या होतात. या घटनेतून सावरून ताकदीनिशी उभ्या झालेल्या पूरग्रस्तांना सलामच !
“पानशेत पूर” हा शब्द जरी एकला तरी अंगावर शहारे येतात. भीती दाटून येते. तो काळा दिवस होता १२ जुलै, १९६१ आजही हा दिवस पुण्यातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या मनावर कोरला आहे. याच दिवशी पानशेत धरण फुटलं होत आणि पुणे शहर जलमय झालं होतं. त्यामुळे अनेकांची घरे उध्वस्त झाली. लोकांचा संसार उघड्यावर आला. त्यानंतर जणू प्रत्येक जण म्हणत होतं. ‘कोणी घर देतं कारे ! घर !
प्रशासनाची अतिघाई नडली आणि दुर्घटना घडली. असे म्हणायला हरकत नाही. १२ जुलै १९६१ या दिवशी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटले. बंड गार्डन पूल सोडून पुण्यातील तत्कालीन बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते. मुठा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठ इत्यादी भागांची पुष्कळ हानी झाली होती. ७५० घरे उद्ध्वस्त झाली. तब्बल २६ हजार कुटुंबांच्या घरगुती मालमत्तेची संपूर्ण हानी झाली. दहा हजार कुटुंबे बेघर झाली. सोळा हजार दुकानांतील वस्तूंचे साठे नष्ट झाले होते. या घटनेला आज ५७ वर्ष पूर्ण झाले. तरी देखील ही घटना आजही नागरिकांच्या मनात जिवंत आहे.

 

संपूर्ण लेख वाचण्यासाठी क्लिक करा…

‘पानशेत पुरा’च्या अंधारातून उजेड शोधणाऱ्या पूरग्रस्तांना सलामच !


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)