#व्हिडीओ : विकलांग व्यक्‍तीला भाजप नेत्याकडून मारहाण

नवी दिल्ली: केंद्रातील आणि उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्या एका विकलांग व्यक्‍तीला भाजपच्या नेत्याने मारहाण केल्याचे उघड झाले आहे. संबंधित विकलांग व्यक्‍तीने समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना मतदान करण्याचा आपला निर्णय जाहीर केला होता. यानंतर संबळ भागातील भाजपचे नेते मोहंम्मद मियां यांनी या विकलांग व्यक्‍तीला काठीने मारहाण केली आणि त्याच्या तोंडात काठी ठोसण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावरून मोठ्या प्रमाणावर पसरल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. “व्होट देंगे अखिलेश को.’ असे हा व्यक्‍ती ओरडत होता. तर मोहम्मद मियां यांनी त्याला हाकलवून लावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र हा विकलांग व्यक्‍ती दारुडा होता आणि भाजपला बदनाम करण्याचा हा कट होता, असे स्पष्टिकरण मोहम्मद मियां यांनी दिले आहे. हा माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शिव्या देत होता. त्यामुळे त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याला तेथून जायला सांगितले. त्याच्या तोंडात काठी खुपसण्याचा प्रयत्न केला नाही, असे ते म्हणाले. पोलिसांनी काल रात्री हे प्रकरण दाखल करून घेतले आहे आणि दोषींना अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे, पोलिस अधिकारी सुदेश कुमार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)