Video : साहेब चहा-पाणी घ्या…..पण आमच्या भागाला पाणी द्या…!!!

पुणे : खराडी-चंदननगर वडगावशेरी मधील पाणीपुरवठा सुरळीत होईल काय…? आतातरी प्रशासनाचे डोळे उघडतील काय…? असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी आज आंदोलन केलं. वारंवार तक्रार करत असून सुद्धा महापालिका अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या तक्रारींकडे डोळेझाक करतात…त्यामुळे हे अनोखे चहा पाणी आंदोलन करण्यात आले.

नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, नगरसेवक महेंद्र पठारे, आमदार बापूसाहेब पठारे,  नारायणभाऊ गलांडे, नगरसेविका सुमनताई पठारे, नगरसेविका संजिलाताई पठारे, सदाशिव गायकवाड, चिराग टोपे, सागर कांबळे, सोमनाथ साबळे, कृष्णा अय्यर, गणेश कांबळे व खराडी- चंदननगर, वडगावशेरी परिसरातील नागरिक या आंदोलना दरम्यान उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
14 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)