सातारा ; ‘केसरी’च्या सेटला आग

ब्लास्ट करताना दुर्घटना:लाखो रुपयांचे नुकसान
सातारा : धर्मा प्रॉडक्‍शन निर्मीत केसरी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटला अचानक आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. कोरेगाव तालुक्‍यातील भावेनगर येथे गेली दोन महिने सुरू असलेल्या ‘केसरी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तयार केलेल्या सेटपैकी अर्ध्या सेटला आग लावुन तो ब्लास्ट करायचा होता. अर्थात हा चित्रीकरणाचाच एक भाग होता. मात्र सांयकाळची वेळ असल्याने सुटलेल्या वाऱ्याने अर्ध्या सेटला लावलेली आग संपुर्ण सेटला लागली.

त्यावेळी आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक व धर्मा प्रॉडक्‍शनचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले पण त्याला काही यश आले नाही.सायंकाळी पडलेला अंधार व सुटलेला वारा आग विझवण्यात अडथळे निर्माण करत होता. दरम्यान पाचगणी नगरपरिषदेच्या व शरयू ऍग्रोच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी रात्री उशीरा आग आटोक्‍यात आणली. दरम्यान घटनास्थळाला कोरेगावच्या पोलिस उपअधिक्षक प्रेरणा कट्टे, स.पो.नि. युवराज हांडे यांनी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)