video…सागरी संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी तयार केला ‘रोबोट फिश’

वॉशिंग्टन : खोल समुद्रात नेमक्या काय घडामोडी घडतात, याचा सखोल अभ्यास करण्यासाठी अमेरिकन संशोधकांनी ‘रोबोट फिश’ तयार केला आहे. ‘सोफी’ असे नाव या ‘रोबोट फिश’ला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, समुद्रातील इतर माशांप्रमाणे हा ‘रोबोट फिश’ पोहू शकणार आहे.

सरळमागेपुढे आणि वर तसेच खालच्या बाजूने सूरही मारू शकतो. सिलिकॉन रबरपासून हा फिश बनवण्यात आला आहे. त्यात एक कॅमेरादेखील बसवण्यात आला आहे.

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी हा मासा तयार केला आहे. या माशाची यशस्वी चाचणीही घेण्यात आली. सोफी सध्या तरी समुद्रात ५०फुटांपर्यंत पोहू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)