Video : सध्या मास्टर ब्लास्टर सचिनचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला, त्याला आता पाच वर्षे व्हायला आली आहेत. सचिनचा मित्र आणि माजी कसोटीवीर विनोद कांबळी याने सचिनचा चक्क मुंबईच्या रस्त्यावर फलंदाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

रविवारी रात्री हॉटेलामध्ये काम करणारी काही मुलं रस्त्यावर क्रिकेट खेळत होती. त्याचवेळी सचिन तिथून गाडीतून निघाला होता. या मुलांना क्रिकेट खेळताना पाहून सचिनलाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. या मुलांबरोबर सचिनने क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना विनोद कांबळी म्हणाला की,  ‘हा व्हिडीओ आपल्याला एका मित्राने पाठवला. त्यानंतर तो मी सोशल मीडियावर पोस्ट केला. सचिन हा क्रिकेटचा देव आहे. अनेकांना सचिनला पाहण्याची उत्सुकता असते. अशावेळी खुद्द सचिन रस्त्यावर रात्रीच्या वेळी क्रिकेट खेळताना पाहून मलाही आश्चर्य वाटले. म्हणून मी हा व्हिडीओ पोस्ट केला.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)