पुणे – बाप्पांच्या आगमनासाठी पुण्यनगरी सज्ज झाली असून सगळीकडे चैतन्य, आनंद आणि उत्साहाचे वातावरणात आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या भक्तांच्या लाडक्या बाप्पांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला आहे. यावेळी बाप्पांची मुर्ती फुलांच्या रथात ठेवण्यात आली. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीची उत्साहात सुरूवात झाली. महान गाणपत्य श्री गणेश योगींद्राचार्यांच्या परंपरेतील डॉ. धुंडीराज पाठक शास्री यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने यंदा तामिळनाडू येथील श्री राजराजेश्‍वर मंदिर साकारण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)