video…शिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोवरमध्ये मारामारी…?

कॉमेडीचा बादशाह सुनील ग्रोवर आयपीएलची खास वेब सिरीज ‘जियो धन धना धन’ मध्ये व्यस्त आहे. यामध्ये सुनीलसोबत शिल्पा शिंदे आणि सुगंधा मिश्रादेखील काम करत आहेत. ‘डॉ.गुलाटी’मुळे हा शो चर्चेत आहे. पण सध्या याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये शिल्पा आणि सुनील ग्रोवर मारामारी करताना दिसत आहेत.

दोघेही आपल्या कॅरेक्टरमध्ये आहेत. सुनील शिल्पाचा हाथ पकडतो आणि तिला खाली पाडतो. त्यानंतर ती सावरते आणि पलटवार करायला सुरुवात करते. शूटींग दरम्यानचा हा व्हिडिओ आहे जेव्हा दोघेही एकमेकांवर हल्ला करतायत. यामध्ये शिल्पाच्या हसण्याचा आवाजही ऐकायला मिळत आहे. जियो अॅपवर सुरु असलेला सुनीलचा शो चाहत्यांच्या पसंतीस पडतोय. खूप मोठा काळ वाट पाहिल्यानंतर सुनील चाहत्यांसमोर आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)