video…’रेस 3′ मधील सलमानने लिहिलेले ‘हे’ गाणे प्रदर्शित

सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ‘रेस 3’ चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचा व्हिडिओ रिलीज झाला आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे सलमान खान त्यात झळकणार तर आहेच, मात्र गाणे लिहिलेही त्यानेच आहे. सलमान खानला आतापर्यंत हँगओव्हर, जुम्मे की रात, बेबी को बेस पसंद है, जग घुमेया यासारखी गाणी गाताना आपण ऐकले आहे. मात्र सलमान पहिल्यांदाच गीतकाराच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.

सेल्फिश गाण्याच्या व्हिडिओत सलमान आणि बॉबी देओल अशा दोघांसोबत जॅकलिन रोमान्स करताना दिसणार आहे. पाकिस्तानी गायक आतिफ असलम आणि रोमानियन अभिनेत्री युलिया वंतूर यांनी हे गाणे गायले आहे. ‘एक बार सेल्फिश होऊन स्वतःसाठी जगा ना’ असे कॅप्शन देत सलमान खानने या गाण्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)