video…मोदींकडून पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा ‘असा’ होतो अपमान-राहुल गांधी

नवी दिल्ली: काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा अपमान करतात, अशी टीका राहुल यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे. यामध्ये मोदी पंतप्रधान होण्याआधी आणि नंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याशी कसे वागले, हे दाखवण्याचा प्रयत्न मोदींनी केला आहे. आपल्या गुरुंचा आणि पक्षातील ज्येष्ठांचा अपमान करुन पंतप्रधान आपल्या संस्कृतीचे जतन करत आहेत, असा टोला राहुल यांनी लगावला आहे.

‘एकलव्याने त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदक्षिणा दिली होती. मात्र भाजपामध्ये स्वत:च्या गुरुंना बाजूला केले जाते. वाजपेयीजी, अडवाणीजी, जसवंत सिंगजी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करुन पंतप्रधान भारतीय संस्कृतीचे जतन करत आहेत,’ असा चिमटा राहुल गांधींनी काढला आहे. आज सकाळी राहुल यांनी हे ट्विट केले. त्याआधी काल राहुल गांधी मुंबईत होते. त्यावेळी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करतानाही राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना भाजपामध्ये ज्येष्ठांचा अपमान होत असल्याचे म्हटले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लालकृष्ण अडवाणी मोदींचे गुरु आहेत. मात्र मोदी त्यांचाही आदर करत नाहीत, हे अनेक कार्यक्रमांमधून दिसून आलं आहे. काँग्रेसनं अडवाणींना भाजपापेक्षा अधिक आदर दिला,’ असं राहुल म्हणाले. भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांना सन्मान दिला जात नाही, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांवर निशाणा साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)