video : मानवी साखळीद्वारे तयार केला भारताचा नकाशा…

प्रजासत्ताक दिनानिमित्त झील एज्युकेशनतर्फे अनोखा उपक्रम

-Ads-

पुणे – वेळ सकाळी अकराची … स्थळ- नऱ्हे येथील झील एज्युकेशन कॅम्पस…संपूर्ण कॅम्पस तिरंगामय, सर्वत्र राष्ट्रभक्तीचे वातावरण, तब्बल 1800 तरुण-तरुणी “भारत माता की जय’, “वंदे मातरम’, “मॉं तुझे सलाम’ असा जयघोष करीत विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व जल्लोष केला. आज सकाळी झील एज्युकेशन सोसायटीच्या नऱ्हे येथील कॅम्पसध्ये “मानवता आणि एकता’ हा संदेश देण्यासाठी 1800 विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा कॅम्पसमधील मैदानात तयार करण्यात आला. या नकाशात विद्यार्थ्यांनी तिरंगा साकारला होता. या नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे झीलने यंदा प्रजासत्ताक दिन साजरा केला.

कार्यक्रमासाठी सहायक पोलीस आयुक्‍त व पुणे एटीएस प्रमुख भानुप्रताप बर्गे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भानुप्रताप बर्गे म्हणाले की, देशामध्ये दहशतवादविरोधी लढ्यासाठी जाणीवपूर्वक जागरूक व्हावे. विविध धार्मिक समुदायाने एकमेकांशी संवाद साधणे आणि समजून घेणे आवश्‍यक आहे. समाजविघातक शक्तीविरुद्ध सर्व तरुणांनी एकत्र येऊन देशाच्या अंतर्गत सुरक्षेला बळकट केले पाहिजे.

यावेळी 1800 विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा तयार केला. महिनाभर झील एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी या उपक्रमाची तयारी करत होते. झील युथ क्‍लबच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. महिला सबलीकरणासाठी प्रयत्नशील असलेल्या रणांगिणी या गटातील 300 मुलींनी सहभाग घेतला. या उपक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांनी केले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना सोसायटीचे कार्यकारी संचालक जयेश काटकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. विरेश चपटे व प्रा. सचिन वाडेकर यांनी काम केले. कॅम्पस डायरेक्‍टर डॉ.संजय देवकर यांनी आभार मानले.

What is your reaction?
46 :thumbsup:
117 :heart:
6 :joy:
23 :heart_eyes:
44 :blush:
4 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)