VIDEO: मदतीसाठी नुसत्याच बैठका, कालावग्रस्तांचे हाल सुरूच

कोणी घेर देतं का… घर! अशी विनवणी येथील आपत्तीग्रस्त महिला करत आहेत

पुणे: पुण्यात दांडेकर पूलाजवळील मुठा कालवा फुटल्याने या भागातील नागरिकांना पुर परिस्थितीचा सामना करावा लागला. येथील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सरकारने दोन वेळा पंचनामे करून आपद्‌ग्रस्तांसाठी 3 कोटी  रुपयाची मदत तर जाहीर केली. मात्र अद्याप कोणतीही मदत येथील नागरिकांना मिळाली नाही.

मुळा-मुठा कालवा फुटल्याने काही क्षणातच होत्याचे-नव्हते झाले. अनेकांचे संसार डोळ्यासमोर उध्वस्थ झाले. तर कोणाचे घर पाण्यासोबतच वाहून गेले. ना, झोपायला जागा, ना छत, अश्या परिस्थिती येथील कुटुंबे गेली ९ दिवस राहत आहे. कोणी घेर देतं का… घर! अशी विनवणी येथील महिला करत आहेत. सरकारने आपत्तीग्रस्तांना मदत तर जाहीर केली मात्र अंलबजावणीच काय ? असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
12 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)