Video : भारत आणि मंगोलिया यांच्यातील संबंध आणखी सुधारतील : स्वराज

उलानबातर : भारत आणि मंगोलिया देशांना जोडणारा बौद्ध धर्मामुळे हा धागा आहे. यामुळे दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंध भविष्यात आणखी वाढतील, अशी अपेक्षा भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली आहे.

मंगोलियाची राजधानी उलानबातर येथे बौद्ध धर्मगुरु कुशोक बाकुला यांच्या १०० व्या जन्मदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी परराष्ट्र मंत्री डिमडीन सोग्तबातर हे देखील याठिकाणी उपस्थित होते.

-Ads-

बौध्द धर्माचा उगम भारतीय भूमीत झाला. त्यानंतर तो जगभर पसरला. मंगोलियामध्ये देखील बौद्ध धर्माला अत्यंत महत्त्वाचे आणि आदराचे स्थान मिळाले आहे. यामुळेच भारत आणि मंगोलिया यांच्यात सांकृतिक संबंध देखील जोडले गेले आहे, असे स्वराज यावेळी म्हणाल्या. तसेच याचा दोन्ही देशांना भविष्यातील आपल्या संबंधांसाठी खूप फायदा होणार असल्याचेही त्यांनी म्हटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)