VIDEO: भाजपचा संविधानावर विश्वास नाही – शरद पवार

पुणे: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाव कार्यक्रमात शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘सीबीआयमध्ये जे काही झालं. ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या ते देशासाठी घातक होतं. आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा असा इशाराच सरकारनं प्रशासनाला यातून दिला. तसेच भाजपचा संविधानावर विश्वास नसल्याचे शरद पवार म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘सर्वोच्च न्यायालयानं सबरीमलामध्ये महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले. पण भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ज्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही असे निर्णय न्यायालय कसं देऊ शकते असे शहा म्हणतात. भाजपवाल्यानं देशाची घटना, न्यायालयाचे आदेश मान्य नाहीत हेच यातून स्पष्ट होत असल्याचे शरद पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)