Video : बोटा येथील आठ दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडली

नितिन शेळके

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका दुकानातील चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न CCTV मध्ये कैद
संगमनेर : पुणे नाशिक महामार्गावरील बोटा गावातील आठ दुकाने आज पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडली. दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. मात्र किती मुद्देमाल चोरून नेला हे अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप निघोट, पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी घटनास्थळी भेट दिली. गावातीलच श्रीहरी ट्रेडर्स या दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार चोरटे कैद झाले आहेत.

त्यांनी या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न कोणाची तरी येण्याची चाहुल लागल्याने फसला. विषेश म्हणजे यापूर्वी बोटा येथे दोन वेळा अशाच प्रकारे चोरी झाली होती, त्यावेळीही एकदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले होते, त्यावेळीही चोरट्यांचा तपास लावण्यात घारगाव पोलिसांना अपयश आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)