बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘संजू’ चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा होती, ती आता संपली आहे. कारण रणबीर कपूरच्या ‘संजू’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित या चित्रपटात रणबीर संजूबाबाची भूमिका साकारत आहे. रणबीरसोबतच सोनम कपूर, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, जिम सर्भ अशी कलाकारांची फौजच या चित्रपटात पाहायला मिळते.

‘रॉकी’ या पहिल्या चित्रपटापासून ते संजय दत्तचे रिलेशनशिप, त्याची व्यसनाधीनता, कारागृहात काढलेले दिवस हे सर्व या तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट असून संजय दत्त म्हणून रणबीरने अप्रतिम भूमिका साकारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)