पेइचिंग : लग्नामध्ये नवरदेव घोड्यावर बसून विवाहमंडपात येत असल्याचे आपण पाहतो. भारतामध्ये ही पद्धत जवळपास सगळीकडेच वापरली जाते. पण चीनमधील एक घटना सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. लग्नस्थळी पोहचण्यासाठी नववधुने चक्क बस चालवल्याचे तेथे पाहायला मिळाले. स्वतः बस चालवून ही नववधू लग्नस्थळी पोहचली इतकेच नाही, तर रस्त्यात थांबून तिने तिच्या होणाऱ्या पतीलाही पिक केले.

चीनच्या पीपल्य डेलीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये वधु बस चालवता दिसत आहे. नववधु बसणार म्हणून बससुद्धा फुलांनी व त्या दोघांच्या फोटोंनी सजविली आहे. ही नववधु स्वतः बसचालक आहे. त्यामुळे तिने आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशीही बसने प्रवास करायचं ठरवलं. ‘बसमुळे कार्बन कमी प्रमाणात उत्सर्जित होईल’, हा विचार करून बसचा पर्याय निवडल्याचं तिने म्हटलं. दरम्यान, सोशल मीडियावर या बस ड्रायव्हर मुलीचं खूप कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)