Video : पुणे – नाशिक महामार्गावर विचित्र अपघात;अपघातग्रस्त टेम्पोतील आंबे नागरिकांनी लुटले

नितिन शेळके

संगमनेर : अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना माणुसकीच्या भावनेतून मदत करायला हवी, मात्र हल्ली असे होतांना दिसत नाही. त्यामुळे अपघातग्रस्तांना वेळेवर मदत न मिळाल्याने त्यांचा जीव जाण्याच्या घटना ताज्या आहेत. संगमनेरमध्येदेखील असाच एक प्रकार घडला. पाच वाहनांच्या विचीत्र अपघातात एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले. महामार्गावर घाटात झालेल्या या अपघातात रस्त्यावरील आंबे पळवून नेत नागरिकांनी आपल्यातील माणुसकी जिवंत नसल्याचे प्रत्यंतर दाखविले.
नाशिक-पुणे मार्गावरील चंदनापुरी घाटातील एका धोकादायक वळणावर गुरुवारी पहाटे आंब्याची वाहतुक करणारा टेंम्पो पलटी झाला. चौपदरीकरण झालेल्या या मार्गावर महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत मिळवुन देत हे वाहन रस्त्यातुन बाजुला घेणे आवश्यक होते. मात्र त्यांनी अपघातातील वाहन बाजुला घेण्यासाठी मदत केली नाही, परिणामी पाठीमागुन भरधाव वेगात आलेला एक टेम्पो या वाहनाला धडकला. त्यापाठोपाठ रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने वाचविण्याच्या प्रयत्नात एक कंटेनर थेट दुभाजकावर जाऊन अडकून पडला. त्यानंतर मागुन आलेला एक दुचाकीस्वार अपघातग्रस्त दोन वाहनांना धडकला. एवढे होत नाही तोच आणखी एक भरधाव वेगात आलेला टेंम्पोदेखील या वाहनांना धडकून रस्त्याच आडवा झाल्याने रस्ताची एक लेन वाहतुकीला बंद झाली होती. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून त्याचे नाव कैलास अशोक पाटील ( वय 35 ) रा. शहापूर, अंमळनेर असे आहे. याशिवाय युमेश कुमार सिंग सह आणखी एक जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

त्यामुळे मार्गावर पुण्याकडून येणाऱ्या वाहनांची कोंडी झाली. रस्त्याची एक बाजु पुर्णता बंद झाल्याने याची माहिती पहाटेच पोलिसांना मिळाली. निरीक्षक सुनील पाटील आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने महामार्गाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बोलावून घेत दुभाजक तोडला आणि वाहतुक सुरळीत केली. एकीकडे असे घडत असतांना दुसरीकडे या अपघातग्रस्तांना मदत करण्याची जबाबदारी महामार्ग पोलिस, टोल प्रशासन आणि रोड पेट्रोलिंग ऑकर, हेल्पर यांनी वेळेत अपघातग्रस्तांना कोणतीच मदत केली नाही.

अपघातानंतर आंबे तुटून नेणारे नागरिक छाया :- नितिन शेळके

आंब्याची केली लुट
अपघातानंतर टोल प्रशासनाचे कर्मचारी आणि काही नागरिकांनी अपघातग्रस्त वाहनातील रस्त्यावर पडलेले आंबे गोण्या भर-भरुन लुटून नेले. त्यांनी अनेकांना याची माहिती दिल्याने सर्वांनीच एकत्रित या आंब्याची लुट सुरु केली होती. जवळपास पंधरा लाख रुपयांचे हे आंबे हातोहात लंपास करण्यात आले. या सर्वांसोबतच प्रवाश्यांनीदेखील आंब्याची लुट करत आपल्यातील माणुसकी जिवंत नसल्याचे दाखवून दिले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
23 :thumbsup:
10 :heart:
2 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
19 :cry:
16 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)