#Video : पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत – शाहिद आफ्रिदी 

नवी दिल्ली – पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा काश्मीरबाबत वक्तव्य केले आहे. परंतु, यावेळेस आफ्रिदीने पाकिस्तानलाच आरसा दाखवला आहे. पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत, असे वक्तव्य शाहिद आफ्रिदीने एका पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. या पत्रकार परिषेदेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे तो पाकिस्तानी टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे.

शाहिद आफ्रिदीने म्हंटले कि, पाकिस्तानचे नागरिकही पाकिस्तानला सांभाळता येत नाही. ते काश्मीरला काय सांभाळणार, असे वक्तव्य त्याने केले आहे.

-Ads-

काय म्हणाला शाहिद आफ्रिदी 
काश्मीर ही समस्या नाही. पाकिस्तानचे नागरिकही पाकिस्तानला सांभाळता येत नाही. मी म्हणतो पाकिस्तानला काश्मीर नकोय. भारतालाही नका देऊ. काश्मीर पूर्णपणे एक वेगळा देश बनवा. यामुळे कमीत-कमी माणुसकी तर जिवंत राहील. त्याठिकाणी लोक मरत आहेत मग ते कोणत्याही धर्माचे असो. हे पाहून एक माणूस म्हणून दुःख होते.

दरम्यान, याआधी शाहिद आफ्रिदीने दहधसतवाद्यांवरून भारतावर निशाणा साधला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)