#Video: पहा सिध्दार्थ जाधवचे रणवीर आणि रोहित सोबतचे ‘भन्नाट’ बर्थडे सेलिब्रेशन

सिम्बाच्या सेटवर सरप्राइज बर्थ-डे सेलिब्रेशन
अभिनेता सिध्दार्थ जाधवचा 23 ऑक्टोबरला वाढदिवस असतो. यंदाचा वाढदिवस सिध्दार्थसाठी खूप स्पेशल होता. सिध्दार्थ जाधव सध्या रोहित शेट्टीची सिम्बा फिल्म करतोय. ह्या सिनेमाच्या सेटवर एक्शन मॅन रोहित शेट्टी, सुपरस्टार रणवीर सिंग आणि सिम्बाच्या कलावंतांकडून सिध्दार्थला सरप्राइज मिळालं. अक्षरश: दिवाळी साजरी करतात, तसा त्याचा वाढदिवस साजरा झाला.
सिम्बाच्या सेटवर उपस्थित असलेल्या सूत्रांनुसार, सिध्दार्थ मुळत:च खूप मस्तीखोर आणि मनमिळावू आहे. सिध्दार्थसारखाच रणवीरही आहे. त्यामूळे अर्थातच दोघांची सेटवर पटकन बॉन्डिंग झाली. रोहत शेट्टीलाही सिध्दार्थमधली उत्स्फुर्तता खूप आवडते. त्यामूळे रोहितचाही तो खूप लाडका आहे. त्यात सेटवर ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन अनेक मराठी कलावंत काम करतात. त्यामूळे आपल्या लाडक्या ‘सिध्दु’चा वाढदिवस जोशात करायचं सर्वांनी ठरवलं. दिवाळीसारखा अगदी फटाके वगैरे वाजवत, सिध्दूचा वाढदिवस साजरा झाला.
अभिनेता सिध्दार्थ जाधव म्हणतो, “माझ्या भावना व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाही आहेत. हे सर्व माझ्यासाठी स्वप्नवत आहे. रोहितसर, रणवीर आणि सिंबाच्या संपूर्ण टिमने दिलेल्या ह्या प्रेमाने मी एकदम कृतकृत्य झालो. ह्या प्रेमाची उतराई करणे शक्य नाही. मी सर्वांचा अत्यंत आभारी आहे.”
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)