रोबोट आणि माणूस यातला फरक?
रोबोट अमर्त्य आहेत का? यावर ‘हो हे शक्य आहे’ असं सांगत पुढील भविष्यातल्या घडामोडीची जाणीव सोफियाने करून दिली. तर उपस्थितांना काय संदेश देणार? असा प्रश्न सोफियाला विचारण्यात आला.. तेव्हा रोबोट हे माणसाची जागा कधीच घेऊ शकणार नाहीत. मात्र ते नेहमी मदत करतील, माणसाचे श्रम कमी करतील असं वास्तववादी उत्तर देत कार्यक्रमाचा समारोप सोफियाने केला.
मुंबई : जगातील चर्चेचा विषय ठरलेली आणि सौदी अरेबिया देशाचे नागरिकत्व मिळालेल्या ‘सोफिया’ या रोबोटनं मुंबईतल्या आयआयटी टेक फेस्टमध्ये हजेरी लावली. या निमितानं भारतात प्रथमच आलेल्या ‘सोफिया’ने चक्क साडी परिधान केली होती. सोफियाने नागरिकांशी संवाद साधताना ‘नमस्ते इंडिया’ म्हणत आपली ओळख करून देण्यास तिने सुरवात केली. तिला ऐकण्यासाठी आयआयटी सभागृहात खचाखच गर्दी झाली होती.
सुमारे १५ मिनिटांच्या या प्रश्नोत्तरात सोफियाला विविध प्रश्न विचारले गेले. यंत्रमानवावर जास्त पैसे खर्च करणे कितपत योग्य आहे, यावर मात्र सोफिया उत्तर देऊ शकली नाही. त्यानंतर काही तांत्रिक बिघाड झाल्यानं काही वेळ कार्यक्रम थांबवावा लागला होता.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा