video : चीनचा अजब प्रयोग; बँकेत काम करण्यासाठी चक्क रोबोटचा वापर

बीजिंग : गेले काही दिवस विविध कामांसाठी रोबोट म्हणजेच यंत्रमानवाचा वापर वाढला आहे. आता चीनने त्यात आणखी भर घातली आहे. शांघायच्या हुआंगपू जिल्ह्यात एका सरकारी बँकेत काम करण्यासाठी चक्क रोबोट बसवण्यात आला आहे. त्यामुळे या बँकेची वाटचाल आता मानवरहित तंत्राकडे होत आहे.

आलेल्या ग्राहकांशी संवाद साधने, चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकाची ओळख पटवणे, ग्राहकांना अभिवादन करून त्यांची कामे पूर्ण करणे, चलन बदलणे, आर्थिक व्यवहार सांभाळणे, सोने खरेदी आणि अन्य कामकाज अशी कामे हा रोबो सहजतेने पार पाडत आहे. याशिवाय या बँकेत व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी रूम, होलोग्राम मशीन, टॉकिंग रोबो आणि टचस्क्रिन या सुविधादेखील पुरवण्यात आल्या आहेत.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)