Video: गाव पाणीदार करण्यासाठी शंभरी गाठलेल्या आजीबाई करताहेत श्रमदान…

रेडा :- इंदापूर तालुक्यातील मौजे काटी गावात गावकर्यांनी आपले गाव पाणीदार बनवण्यासाठी श्रमदान करण्याचे धोरण ठरवलं असल्याने, आता थेट शंभरी गाठलेल्या आजीबाईंनी ‘मला गाव पाणीदार झालेले पाहायचं आहे,’ ही जिद्द दाखवून हाती घमेले घेऊन श्रमदान करण्याची हिंमत दाखवली आहे. 

पाणी फौंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर काटी गाव पूर्ण तयारीने कामाला लागले आहे. प्रत्येक जण आपल्या परिने गावच्या उपक्रमात सहभागी होऊ लागला आहे.कोणतेही काम करताना मनात जर इच्छाशक्ती असेल तर वय सुद्धा आडवे येत नाही हेच कस्तुराबाई ज्ञानदेव घाटोळे या शंभर वर्षे झालेल्या आजीबाईंनी  गावकाऱ्यांबरोबर श्रमदानात सहभाग घेऊन दाखवून दिले. या वेळी श्रमदानासाठी ग्रीन काटीचे हनुमंत बोराटे, रणजीत बोराटे, चंद्रकांत भोसले, शिवाजी माने, दीपक गुळवे, विकास भोसले, गणेश बोराटे इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)