Video: ज्या उमेदवारांना जनाधार आहे त्यांनाच उमेदवारी दिली जाईल – जयंत पाटील  

  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे लोकसभा मतदारसंघांची चाचपणी
  • शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉन बैठक संपन्न

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे घेण्यात आली. सलग दोन दिवस चालणारी ही मॅरेथॉन बैठक आज ठाणे, कल्याण-डोंबिवली, ईशान्य मुंबई, सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, माढा, यवतमाळ या भागांचा आढावा घेतल्यानंतर संपन्न झाली. यावेळी ज्या ठिकाणी राष्ट्रावदी काँग्रेस पार्टीची ताकद आहे त्या मतदारसंघांबाबत साधक-बाधक चर्चा करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

या आढावा बैठकीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, आम्ही कोणत्या जागा लढवणार यावर बोलण्यापेक्षा जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शक्ती आहे, जिथे राष्ट्रावादीचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशा जागांचा आढावा घेतला गेला. मुंबईत एक जागा वाढवून मिळावी अशी मागणी मुंबईतील कार्यकर्त्यांनी केली असल्याचेही ते म्हणाले. ज्या उमेदवारांना जनाधार आहे त्यांनाच उमेदवारी दिली जाईल, भाजप – शिवसेना युती सरकारचा पराभव करण्यासाठी सर्व गोष्टी करण्यात येईल, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)