#Video : इस्त्रोची मोठी झेप, एकाचवेळी प्रक्षेपित केले ३० उपग्रह

नवी दिल्ली – भारतीय अवकाश संशोधन संस्थेने अंतराळ विश्वात आणखी एक मोठी झेप घेतली आहे. श्रीहरीकोटा येथून इस्त्रोने आज सकाळी पीएसएलव्ही सी ४३ प्रक्षेपकाद्वारे एकाचवेळी ३० उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले.यामध्ये भारतीय उपग्रहासोबत ८  देशांच्या ३० उपग्रहांचा समावेश आहे. ३० पैकी २३ उपग्रह हे अमेरिकेचे असून याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, मलेशिया, नेदरलँड आणि स्पेन यांच्या प्रत्येकी एक-एक उपग्रहाचा समावेश आहे.

पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणाऱ्या हायसिसच्या मदतीने जमीन, पाणी, वनस्पती आणि अन्य गोष्टींची माहिती मिळवता येणार आहे. प्रदुषणाची माहिती देण्यामध्ये या उपग्रहाची सर्वाधिक मदत होईल. या उपग्रहाचे वजन ३८० किलो एवढे आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन पीएसएलव्ही सी ४३ ने सकाळी ९ वाजून ५८ मिनिटांनी अवकाशाच्या दिशेने झेप घेतली.

दरम्यान, इस्त्रोने मागच्यावर्षी १५ फेब्रुवारी २०१७ रोजी सर्वाधिक १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)