VIDEO : ‘आई नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केलाय, मी कदाचित वाचणार नाही…’

दुदर्शनचा कॅमेरामन मोर मुकूट शर्मा याने काढलेल्या व्हिडिओतील एक फ्रेम

हल्ल्यात वाचलेल्या कॅमेरामनने काढलेला हृदयस्पर्शी व्हडिओ 

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दूरदर्शनच्या एका कॅमेरामन सह राखीव पोलीस दलाच्या दोन जवानांचा मृत्यू झाला. नक्षलवाद्यांनी केलेल्या अचानक हल्ल्यामधून केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचलेल्या दूरदर्शनच्या एका असिस्टंट कॅमेरामनचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात कदाचित आपलेही प्राण जातील असे वाटल्याने मोर मुकूट शर्मा नामक दूरदर्शनच्या असिस्टंट कॅमेरामन आपल्या आईच्या नावाने एक व्हिडीओ संदेश रेकॉर्ड केला होता. याच्यामध्ये तो आपल्या आईला नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचे वर्णन करतानाच कदाचित आपण या हल्ल्यातून वाचणार नसून आपण तुझ्यावर खूप प्रेम करत असल्याचे देखील तो आपल्या आईला सांगत आहे.

https://twitter.com/rahulpandita/status/1057489256879394822

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)