Video : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणार…की हा निर्णय राजकारणाच्या चर्चेत विरणार…?

 

नितिन शेळके (संगमनेर प्रतिनिधी, दैनिक प्रभात)

संगमनेर : अहमदनगर राज्यात क्षेत्रफळाने मोठा जिल्हा असल्याने ह्या जिल्ह्याचं विभाजन व्हावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षा पासुन केली जातेय. आता भाजपाचे मंत्रीही विभाजनाचं आश्वासन देत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधीच या प्रश्ना वरुन राजकारणास सुरवात झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रश्न तसा जुनाच, आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यातुन काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राधाकुष्ण विखे हे दोघे आणि राष्ट्रवादीचे मधुकर पिचड यांनी सत्तेत अनेक वर्ष मंत्री पदे भुषविली. जिल्ह्याचं विभाजन करतांना त्यांना मुख्यालयाचं ठिकाण कोणतं असावं यावर मात्र या तिन्ही मंत्र्यात एकमत होवु शकल नव्हतं. आता राज्यात भाजपा सरकारला सत्तेत येवुन तीन वर्षे झालीत. मागील सरकार मधील मंत्र्याना जिल्हा विभाजना बाबत आलेल्या अपयशाचा मुद्दा पालकमंत्री राम शिंदे यांनी उचलत जिल्ह्यात राजकीय डावपेच खेळायला सुरवात केली आहे.

जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांना संगमनेरात जिल्हा मुख्यालय संगमनेरच करण्याचं निवेदन देण्यात आलं. त्यानंतर आपल्या भाषणातही मुनगंटीवारांनी ‘१५ वर्षे मंत्री राहीलेल्यांच्या गावात मी आलोय’ असा थोरातांना चिमटा घेत राम शिंदे, बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या तिघांची एक समिती बनवत त्यांच्या एकमताने नव्या जिल्ह्याचे मुख्यालय ठरवावे, नंतर मला त्यासाठी निधी द्यायला कधीच अडचण येणार नसल्याचे सांगत, चेंडू पुन्हा स्थानिक नेत्यांच्या कडे टोलवलाय.

जिल्हा विभाजन मी करणारच आहे. ते केल्याशिवाय हा पठ्ठ्या थांबणार नाही आता फक्त जिल्ह्याचे मुख्यालय काय तो प्रश्न सोडवू , असं सांगत राम शिंदेनी दंड थोपटेलत तर अर्थमंत्री, महसुल मंत्री यांनीही प्रस्ताव आला तर मंजुरी देवु असं सांगत जिल्हा विभाजनाचा प्रश्न धगधगत ठेवलाय. जिल्ह्याचं विभाजन होणार की हा निर्णय राजकारणाच्या चर्चेत विरणार हे येणारा काळच सांगेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)