video…आसारामचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: लैंगिक शोषणच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आसारामचा एक व्हिडीओ सध्या सोशलमीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने तुरुंगात जाण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. दरम्यान, या व्हिडिओत ‘मला जेलमध्ये जावंसं वाटतंय. काय माहीत कोणत्या निमित्तानं जाईन किंवा असंच सहज जाईन,’ असं काही वर्षांपूर्वी खुद्द आसारामने म्हटले होते. काही वर्षांपूर्वीचा आसारामचा ‘तो’ व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘आपण देवाकडे कधीकधी मस्करीत काहीतरी इच्छा व्यक्त करतो. मात्र देवानं त्या इच्छा गांभीर्यानं घेतल्या की असं होतं,’ अशा मेसेजसह सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जातोय.. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली .’मला तिहारच्या तुरुंगात जाण्याची इच्छा होतेय. आता काय माहीत, कोणत्या निमित्तानं जाईन. किंवा मग असंच तुरुंगात जाईन. सरकारनं अशी कोणती तरी योजना करावी आणि मला तिहारच्या तुरुंगात राहण्याची परवानगी द्यावी. संपूर्ण तुरुंगाचा कायापालट करेन,’ असे या व्हिडिओमध्ये आसाराम बोलताना दिसत आहे. यानंतर आसाराम त्याचे प्रवचन ऐकण्यासाठी आलेल्या अनुयायांना, मी तुरुंगात जाऊ ना? कोणत्या तुरुंगात जाऊ? तिहारच्या की साबरमतीच्या?, असे प्रश्न विचारतो. आसारामच्या या प्रश्नांनंतर अनुयायी, ‘तुरुंगात जाऊ नका,’ असे म्हणतात.

कभी कभी मजाक मे कही बात भगवान सुन लेते है, ये विडीयो ऊदाहरण है, । इसलिये हमेशा अच्छा बोलो

Posted by Bindass Haryana on Wednesday, 21 June 2017


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)