VIDEO : अबब! चाहत्यांनी उभारला धोनीचा ३५ फुटी ‘कट-आउट’

आपल्या उत्तुंग षटकारांसाठी जगभरामध्ये प्रसिद्ध असेलेल्या महेंद्र सिंह धोनी उर्फ कॅप्टन कुल याला तिरुअनंतपुरम येथे वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या ५ व्या एकदिवसीय आंतराष्ट्रीय सामन्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या फॅन्सकडून एक सुखद सरप्राईझ मिळणार आहे. आपल्या आवडत्या माही उर्फ ‘थाला’च्या स्वागतासाठी त्याच्या चाहत्यांनी तब्ब्ल ३५ फुटांचे भले मोठे ‘कट-आउट’ उभारले असून त्याचे फॅन्स धोनीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्स या फ्रेंचायजीद्वारे चेन्नईच्या लाडक्या ‘कॅप्टनच्या’ भव्यदिव्य स्वागताचा व्हिडीओ ट्विटरद्वारे शेअर करण्यात आले असून धोनीच्या या ‘कट-आउटला’ विश्वरूपमम असे संबोधण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ChennaiIPL/status/1057496482671144960

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)