#RanjiTrophy : मुंबई संघ स्पर्धेतून बाहेर, विदर्भाकडून 1 डाव आणि 145 धावांनी पराभव

नागपूर – 41 वेळा रणजी स्पर्धेचा विजेता असलेला मुबंई संघ यंदा रणजी ट्राफी स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मुंबई संघाला मंगळवारी विदर्भ संघाकडून एक डाव आणि 145 धावांनी पराभव पत्करावा लागला.

रणजी ट्राफी स्पर्धेत नाॅकआउटमध्ये आपले स्थान राखण्यासाठी गट ‘अ’ मध्ये मुबंई संघाला विजय आवश्यक होता. पण खराब कामगिरीमुळे मुंबई संघ विदर्भविरूध्द विजय मिळवू शकला नाही. फिरकीपटू आदित्य सरवटे यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर फाॅलोआन मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात मुंबईचा संघ सर्वबाद 113 धावांपर्यतच मजल मारू शकला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 511 धावां केल्या होत्या. विदर्भाकडून वसीम जाफरने सर्वाधिक 178 धावा केल्या. मुबंईचा पहिला डाव 252 आणि दुसरा डाव अवघ्या 113 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात विदर्भाकडून आदित्य सरवटेने 6, वाकरे आणि कर्णवीर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. वसीम जाफर याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)