जोकोविच, नदाल, झ्वेरेव्ह यांची विजयी आगेकूच 

टोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धा 
टोरांटो: विम्बल्डन विजेता नोव्हाक जोकोविच आणि अग्रमानांकित राफेल नदाल यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सरळ सेटमध्ये मात करताना येथे सुरू असलेल्या टोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत आगेकूच केली. तसेच गतविजेता अलेक्‍झांडर झ्वेरेव्ह व डेनिस शापोव्हालोव्ह हे खेळाडू तिसरी फेरी गाठत असताना मिलोस रावनिचचे स्पर्धेतील आव्हान मात्र संपुष्टात आले.
जोकोविचने कॅनडाच्या पीटर पोलान्स्कीचे आव्हान 6-3, 6-4 असे मोडून काढताना तिसरी फेरी गाठली. जोकोविचने सात बिनतोड सर्व्हिस करताना पोलान्स्कीची सर्व्हिस दोन वेळा भेदली. मात्र पोलान्स्कीला जोकोविचची सर्व्हिस एकदाही तोडता आली नाही. जोकोविचने 2009 मध्येही पोलान्स्कीवर असाच विजय मिळविला होता. कारकिर्दीत तब्बल 30 मास्टर्स स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोविचसमोर आता सातवा मानांकित डॉमिनिक थिएम आणि स्टेफानोस सित्सिपास यांच्यातील विजयी खेळाडूचे आव्हान आहे.
नदालने फ्रान्सच्या बेनॉइट पायरेचे आव्हान 6-2, 6-3 असे मोडून काढले. मात्र याआधी तीन वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या नदालने या वेळी आपण शंभर टक्‍के तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट केले. नदालसमोर आता स्टॅनिस्लास वॉवरिन्काचे आव्हान आहे. वॉवरिन्काने मार्टन फस्कोव्हिक्‍सचे आव्हान एका सेटच्या पिछाडीनंतर पुनरागमन करताना 1-6, 7-6, 7-6 असे मोडून काढत आगेकूच केली.
गतविजेत्या झ्वेरेव्हने ब्रॅडली क्‍लानवर 6-4, 6-4 अशी मात केली. तर फ्रॅन्सिस तियाफोने रावनिचवर 7-6, 4-6, 6-1 असा सनसनाटी विजय मिळविला. तसेच शापोव्हालोव्हने 14व्या मानांकित फॅबिओ फॉगनिनीचा 6-3, 7-5 असा पराभव करीत आगेकूच केली. विम्बल्डनची उपान्त्य पेरी गाठणाऱ्या जॉन इस्नरने पिअरे हर्बर्टचा 7-6, 6-2 असा पराभव केला, तर युआन मार्टिन डेल पोट्रोला दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)