विकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक

तमिळमधील सुपरहिट ठरलेल्या “वीरम’च्या हिंदी रीमेकसाठी विकी कौशलला कास्ट करण्यात आले होते. हा चित्रपट साजिद नाडियाडवाला हे “लॅंड ऑफ लुंगी’ या नावाने प्रड्यूस करत असून फरहद सांजी हे दिग्दर्शन करणार आहेत. मात्र, या चित्रपटातून विकी कौशलने माघार घेतली असल्याचे समजते.

या चित्रपटासाठी विकीने पूर्ण तयारी केली होती. पण चित्रपटाच्या शूटिंगच्या डेट्‌स जुळत नसल्याचे समजते. या भूमिकेसाठी विकीच्या अगोदर अक्षय कुमार याच्याशी संर्पक साधण्यात आला होता. पण त्यानेही डेट्‌सचे कारण दिले होते. तसेच विकीचे नावही त्यानेच सुचविले होते. परंतु, आता चित्रपट निर्मात्यांना पुन्हा एकदा नवीन चेह-याचा शोध करावा लागणार आहे.

प्रफेशनल फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास विकीकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. तो उधम सिंह यांच्या बायॉपिकमध्ये व्यस्त असून हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय करण जोहरच्या मल्टी-स्टाटर “तख्त’ चित्रपटही त्याने साईन केला आहे. ज्याचे शूटिंग पुढील वर्षी जानेवारीत होणार आहे. तसेच विकीने भानु प्रताप सिंह यांच्या एका हॉरर मुव्ही आणि मेघना गुलजार यांचा एक चित्रपट साईन केलेला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)