विकी कौशलचा ब्रेक अप

बॉलिवूड्‌मध्ये पदार्पण केल्यापासून थोड्याच दिवसात विकी कौशलने हे दाखवून दिले आहे, की तो ऍक्‍टिंगमध्ये अजिबात कमी नाही. 2018 हे वर्ष त्याच्यासाठी खूपच लकी ठरले. त्याच्या “उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ने बॉक्‍स ऑफिसवर खूप धमाकेदार कमाई केली आहे. या व्यतिरिक्‍त विकी आपल्या पर्सनल लाईफमधील घडामोडींमुळेही चर्चेत राहिला आहे. त्याने हरलीन सेठीबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

हे दोघेजण रिलेशनशीपमध्ये असल्याचे या फोटोवरून दिसत होते. मात्र आता त्यांच्या रिलेशनशीपमध्ये काही व्यत्यय आला असल्यासारखे वाटते आहे. काही दिवसांपूर्वीच हरलीनने इन्स्टाग्रामवर विकी कौशलला अनफॉलो केले आहे. त्याशिवाय तिने इन्स्टाग्रामवर प्रेमभंग झाल्यासारख्या पोस्ट लाईक केल्या आहेत. त्यामुळे दोघांचे रिलेशनशीप आता पूर्वीसारखे राहिलेले नाही, असा अंदाज वर्तवला जायला लागला आहे.

सध्या तरी या दोघांपैकी कोणीही या संदर्भात काहीही बोललेले नाही. अगदी काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या कॉफी चॅट शो मध्ये विकीने आपल्या रिलेशनशीप बाबत उघडपणे माहिती दिली होती. आता ब्रेक अप झाल्याचे लगेच त्याला सांगता येणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)