कृषी क्षेत्रात ‘सहकार’ वाढण्याची गरज

व्यंकय्या नायडू : छोट्या तुकड्यांमुळे शेती करणे अकिफायतशीर

मुंबई – भारतीय कृषी क्षेत्राला चौकटात्मक बंधांचा अंकुश आहे. सध्या केवळ 5.2 टक्के कृषी कुटुंबांकडे स्वत:चे ट्रॅक्‍टर असून 85 टक्के कृषी जमीन ही लघु आणि 2 हेक्‍टरपेक्षा कमी मोजमापाची आहे. ठिबक सिंचन योजना ही केवळ 1.6 टक्के कृषी कुटुंबांकडे ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यात सहकार वाढण्याची गरज असल्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठात लक्ष्मणराव इनामदार जन्मशताब्दी निमित्ताने सहकार भारतीद्वारा आयोजित सहकार या विषयावर ते बोलत होते.

नायडू पुढे म्हणाले की, जागतिक पातळीवर जसे की जपान, जर्मनी, फ्रान्स, नेदरलॅंड आणि अमेरिका, बांग्लादेश यांच्या सहकार क्षेत्रातील विकासाच्या तुलनेत, भारतीय सहकार उद्योगांना बरीच प्रगती करायची आहे. त्यांनी सहकार क्षेत्रातील व्यवस्थापन, सदस्यांच्या सहभागाची उणीव, संस्थांमधील राजकारण, नोकरशाहांचे नियंत्रण या आव्हानांवर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले की, महिला आणि तरुण यांचा या क्षेत्रातील सहभाग निम्न असून या वर्गाला प्रोत्साहन देण्याची आवश्‍यकता आहे. त्यांनी सहकारी पतसंस्थांची कार्यपद्धती, अपूरे स्रोत, सरकारवरील अवलंबितेत वाढ या बाबींमुळे सहकार क्षेत्राची वाढ खुंटली असल्याचे सांगितले.

त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानात्मक अर्थव्यवस्था आणि व्यावसायिक वातावरण सकस असण्यावर जोर दिला. अर्थव्यवस्था म्हटले की स्पर्धा आलीच आणि अति स्पर्धेच्या वातावरणात अर्थव्यवस्थेला हानी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे स्पर्धेला मर्यादा आहे. परंतु सहकारी क्षेत्रात स्पर्धा अमर्यादित आहेत.

सरकार वर्ष 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवण्यावर जोर देत आहे. यासाठी सरकारने प्रधानमंत्री फसल बीमा योजना, कृषी सिंचन योजना, जनधन योजना आणि मुद्रा अशा योजनांची अंमलबजावणी केली आहे. तसेच सरकारने 63,000 पेक्षा जास्त प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना संगणकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अंदाजपत्रकीय पाठिंबा दिला आहे. या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्‍यक आहे असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)