उद्धव ठाकरे यांचे अयोध्येत स्वागत : श्‍याम जाजू

राम मंदिर हा देशाच्या श्रद्धेचा व आस्थेचा विषय

संगमनेर – राम मंदिराचा मुद्दा हा काही नव्याने निर्माण झालेल्या मुद्दा नाही. राम जन्मभूमी हा व देशाच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. आज ठाकरे अयोध्येत मदत करण्यासाठी गेलेत. तर त्याचं स्वागत आहे, असे भाजपाचे उपाध्यक्ष श्‍याम जाजू यांनी यांनी सांगितले.

-Ads-

संगमनेर येथे आज भाजपच्या बूथ कमिटीच्या बैठकीसाठी जाजू हे संगमनेरात आले होते. शासकीय विश्रामगृहात काही वेळ थांबले असता, ते पत्रकारांशी बोलले. ते म्हणाले, राम मंदिराचा मुद्दा हा काय नव्याने निर्माण झालेला मुद्दा नाही. हा मुद्दा या देशातील जनतेने, संघ परिवाराने, साधू-संतांसह भाजपने हा मुद्दा लावून धरलेला आहे.

राम जन्मभूमी हा देशाच्या आस्थेचा व श्रद्धेचा भक्तीचा विषय आहे. या लोकांच्या अस्मितेतून मंदिर तयार झाले पाहिजेत, अशी या देशातील जनतेची इच्छा आहे. बऱ्याच वर्षांपासून हा विषय प्रलंबित आहे. उद्धव ठाकरे त्याठिकाणी समर्थनार्थ गेले आहेत. त्यांचे स्वागत असल्याचे जाजू यांनी सांगितले.

आता देशामध्ये पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. त्यातले राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये भाजप गेल्या 15 वर्षांपासून सतेमध्ये आहे. तेलंगाणा ही आमच्या दृष्टीने थोडं कमकुवत राज्य आहे. काही ठिकाणी भाजपला प्रतिनिधित्व मिळणार आहे. मिझोरममध्ये भाजपचा मोठ्या मताधिक्‍क्‍याने विजय होईल. पाचपैकी चार राज्यांमध्ये आमचं सरकार येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. ते पंतप्रधान झाल्यापासून ज्या-ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, तेथे भाजप जिंकला आहे.

भाजप व शिवसेना यांची युती फार पूर्वीपासून आहे. शिवसेना आणि अकाली दल भाजपचे देशातील सर्वांत जुने मित्र आहेत. 1984 पासून ही युती आहे. आता देशाचं वातावरण विकासाच्या दिशेने जात आहे. पंतप्रधान मोदी व खा. अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देश ज्या प्रकारे विकासाकडे घोडदौड करत आहे, त्यामुळे सर्व मित्रपक्ष भाजपबरोबर राहतील, असा मला विश्वास असल्याचे जाजू यांनी सांगितले.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, सचिव सुधाकर गुंजाळ, राजेंद्र देशमुख, दिनेश सोमाणी, श्रीनिवास पडतानी, नीलेश जाजू आदींसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)